anekant.news@gmail.com

9960806673

भोगावती डिस्टलरी प्रकल्प प्रारंभ

राशिवडे ः अनेक दिवसांपासुन बंद असलेल्या भोगावती कारखान्याच्या आसवनी प्रकल्पाचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्या हस्ते झाला. 7 वर्षांपूर्वी संचालक मंडळाने हा प्रकल्प भाडेतत्तावर खासगी मालकाला चालविण्यासाठी दिला होता. मात्र तो काही दिवसांपासून बंद होता म्हणून कारखान्याच्या मागील संचालक मंडळाने तो ताब्यात घेतला. मात्र, विद्यमान संचालक मंडळाने हा प्रकल्प कारखान्यामार्फत चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. (पुढारी, 04.04.2024)