anekant.news@gmail.com

9960806673

‘शाहू’ साखर कारखान्याचे ३१०० रुपये उसबील जमा

कागल : येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२०२५ मध्ये ऊस बिलाची प्रती टन ३१०० रूपये प्रमाणे रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली आहे. अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सभासद शेतकरी केंद्रबिंदू मानून कारखान्याची यशस्वी वाटचाल त्यांच्या पश्चात अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नोव्हेंबर २०२४ अखेर कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.

या हंगामात व्यवस्थापनाने केलेल्या नियोजनामुळे गाळप क्षमतेइतका ऊस पुरवठा करण्याइतकी पुरेशी यंत्रणा उपलब्ध झाली आहे. व्यवस्थापनाने या गळीत हंगामासाठी अकरा लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी सभासद आणि बिगर सभासद शेतकऱ्यांनी नोंदविलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवून सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी केले.