खर्च वाजवी असल्याची खात्री करा, नांदेडच्या प्रादेशिक उपसंचालकांचे आवाहन
नांदेड ः नांदेड प्रादेशिक विभागातील ऊस उत्पादक शेतकर्यांना गाळप हंगाम २०२४-२५ या वर्षाच्या ऊसतोडणी व वाहतूक खर्चाची माहिती देण्यात आली आहे. नांदेड विभागातील सर्व शेतकर्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) विश्वास देशमुख यांनी केले आहे.
कारखान्याचा ऊसतोडणी व वाहतूक खर्च हा वाजवी असल्याची खात्री शेतकर्यांनी करावी. गाळपास ऊस देताना ऊस उत्पादक शेतकर्यांनी जवळच्या कारखान्याची निवड करावी. सरासरी ऊसतोडणी व वाहतूक खर्च जर शेतकर्यांना जास्त वाटत असेल तर संबंधित कारखान्याच्या कार्यक्रमानुसार स्वतः ऊसतोडणी करून गाळपासाठी नेता येईल.
सद्यःस्थितीच्या परिस्थितीनुसार कारखान्यांमार्फत ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा उभारणी करून शेतकर्र्यांच्या वतीने त्यांच्या उसाची तोडणी व वाहतूक केली जाते. ही ऊसतोडणी व वाहतूकीपोटी आलेला हा खर्च हा ऊस पुरवठादार शेतकर्यांच्या ढोबळ रास्त व किफायतशीर दराच्या (एफआरपी) देय रकमेतून कपात करण्यात येतो.
जिल्हानिहाय सरासरी ऊसतोडणी व वाहतूक खर्चाची माहिती रूपयांत खालील प्रमाणे -
नांदेड - भाऊराव चव्हाण स.सा.का. ८८८.३८ प्रतिटन, श्री सुभाष शुगर हदगाव ८८८.३८ प्रतिटन, एमव्हीके अॅग्रो फूडस वाघलवाड ९०६.५७ प्रतिटन, कुंटुरकर शुगर ९५०.३६ प्रतिटन, शिवाजी सर्व्हिस स्टेशन ८६५.२४ प्रतिटन
हिंगोली - भाऊराव चव्हाण स.सा.का. डोंगरकडा ८६६.६९ प्रतिटन, पूर्ण स.सा.का. ८८५.८८ प्रतिटन, कपिश्वर शुगर ८४६.२५ प्रतिटन, टोकाई स.सा.का. ८९०.३६ प्रतिटन, शिऊर सा.का. वाकोडी ९१०.७२ प्रतिटन
परभणी - गंगाखेड शुगर माखणी ११८४.४४ प्रतिटन, योगेश्वरी शुगर ८९३.९० प्रतिटन, बळीराजा सा.का. ८४५.६२ प्रतिटन, श्री रेणुका शुगर ९०६.१५ प्रतिटन, श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर १०२१.७२ प्रतिटन, ट्वेंटीवन शुगर सायखेडा १०६५.६६ प्रतिटन, श्री तुळजाभवानी शुगर आडगाव ८८७.५३ प्रतिटन, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा स.सा.का. ९३१.५२ प्रतिटन, विलास स.सा.का. निवळी ९५७.९० प्रतिटन, विलास स.सा.का. युनिट-२ तोंडार १०२५.१६ प्रतिटन, रेणा स.सा.का. ८५४.१८ प्रतिटन संत शिरोमणी मारूती महाराज स.सा.का. ८९१.०७ प्रतिटन, सिद्धी शुगर अजना ११७७.६३ प्रतिटन, जागृती शुगर तळेगाव ८९९.९२ प्रतिटन, श्री साईबाबा शुगर ९२६.१४ प्रतिटन, ट्वेंटीवन शुगर्स मळवटी १०८२.८४ प्रतिटन, ओंकार सा.का. अंबुलगा ११५३.८४ प्रतिटन, शेतकरी स.सा.का. किल्लारी ८७४.५५ प्रतिटन (अॅग्रोवन, ३०.११.२०२५)